नावेवरती होउन स्वार
जाइन कुठेतरी दूर
जिथून स्पष्ट होतील क्षितीजाच्या अस्पष्ट रेषा
क्षणभर का होइना
पण सामावून घेइल माझ अस्तित्व
असा समुद्र शोधतो आहे…
असा समुद्र शोधतो आहे…

आयुष्याच्या खोल डोहात असाच सूर मारेन
करत स्पर्धा त्या सुर्या च्याही तेजाशी
क्षणभर का होइना पण ग्रहण लागेल त्या सुर्यालाही
असा चंद्र शोधतो आहे…..
असा चंद्र शोधतो आहे…..
-Suraj Nachanekar
WhatsApp-Image-20160514 (3)

Advertisements

पहिली भेट अन तुझा पहिला स्पर्श
तुझ्याइतकाच नविन होता
भेटीची वेळही नेमकीच होती,
मनाला मात्र आजून वेळ हवा होता…..

WhatsApp-Image-20160514

तु भेटली होतीस एकदाalone-66582_640

अशाच एका वळणावर ,

शब्दांविणा झाली भेट

अन प्रेम झाले जगण्यावर

 

शब्दांविणा खुप काही

तु बोलुनसुद्धा गेलीस ,

न बोलताही सारं

सांगुनसुद्धा गेलीस

 

डोळे होते स्तब्ध

होते शब्द सारे मुके ,

तुझ्यासाठी दाटलेले

होते भावनांचे धुके

 

पुन्हा त्याच वळणावर

खुप वाट पाहिली ,

होते एक अनामिक

आठवण फक्त  राहिली

 

अजुनही पाहतोय  वाट

त्याच गोड वळणावर ,

कारण शब्दाविना होऊन भेट

प्रेम झालेलं  जगण्यावर …

आठवतोय का पाऊस तुला काळजात माझ्या साटलेला ,

सोबत होती तुझी अन नभही वेडा दाटलेला

 

सरींनी  पावसाच्या देह तुझा चिंब चिंब भिजलेला ,

people-164186_640

पहिलाच तो पाऊस तुझ्या माझ्या काळजाला भिडलेला

 

पहिल्याच त्या पावसाने मनात प्रेमांकुर  फुटलेला ,

गंध प्रितीचा तुझ्या माझ्या मनात खोलवर रुजलेला

 

मन होत एक मात्र स्पर्शासाठी जीव झुरलेला ,

आठवतोय तो प्रत्येक क्षण त्या पावसात जगलेला

 

असा क्षण जपुन राहो  तुझ्या  माझ्या  काळजातला ,

सोबत असावी तुझी अन नभही वेडा दाटलेला…

तुझ्याविना

Posted: January 19, 2014 in Uncategorized

तू आलीस घेऊन सप्तरंग , गंधित श्वास अन नवतरंग,

धुंदीत स्वप्ने अन आस संग, का वाटते का मन कसे ,

असे रिते तुझ्याविना …..

1044176_529616310433686_1402947193_n

तू आलीस घेऊन स्वप्नभास, लागला जीवास एक ध्यास ,

आठवणी नि  गंधित श्वास, का वाटते का मन कसे ,

असे रिते तुझ्याविना …..

तू आलीस घेऊन चांदरात, बहरलेली  स्वप्ने नव पहाट,

आठवणी नि दाटलेली पाउलवाट , का वाटते का मन कसे  ,

असे रिते तुझ्याविना …..

तू आलीस घेऊन पुष्पगंध, पहिला पाऊस अन मृदगंध ,

चिरायू  राहो अपुल्या प्रीतीचा बंध , का वाटते का मन कसे

असे रिते तुझ्याविना …..